मुंबई

ठाणे थोडक्यात

CD

''इंडिया गॉट लेटेंट''कार्यक्रम बंद करण्याची मागणी
उल्हासनगर (वार्ताहर) : अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या ''इंडिया गॉट लेटेंट''सारखे अनेक कार्यक्रम सध्या यूट्युबच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी. तसेच संबंधित निर्माते-दिग्दर्शक-कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलतचे प्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे तरुणाई गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची दाट शक्यता आहे. घराघरात इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्याने घरातील लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून कडक कायदा अमलात आणावा. तसेच असले कार्यक्रम तत्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना देण्यात आलेल्या निवेदनात केल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा संघटक दिलीप थोरात, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी दिली. या वेळी उपशहर अध्यक्ष मुकेश शेठपलांनी, रवी पाल, विभाग अध्यक्ष देवा तायडे, शाखा अध्यक्ष अजय वानखेडे उपस्थित होते.
.........................
प्रवीण पवारची कॅप्टनपदी नियुक्ती
कल्याण (वार्ताहर) : परिषद प्राथमिक शाळा उसाटणेच्या मुख्याध्यापिका संगीता पवार आणि बृहन्मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक नंदलाल पवार यांचा मुलगा प्रवीण पवार हा कॅप्टनपदाची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. बारावीची परीक्षा झाल्यावर प्रवीणने पायलट होण्यासाठी पूर्व परीक्षा दिली. त्यातून पुढे कॅनडा येथे पायलटचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. भारतात येऊन तो येथील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. सुरुवातीला जेट एअरवेजमध्ये अनुभव घेतला. पुढे अकासा एअरमध्ये तो पायलटपदावर नियुक्त झाला. त्यानंतर त्याने कॅप्टनपदाची परीक्षा दिली. पायलट म्हणून केलेल्या कार्यातील प्रामाणिकपणा, थरारक उड्डाण, उल्लेखनीय कामगिरी, कष्ट करण्याची तयारी, समर्पण व चिकाटी यातूनच अकासा एअरने प्रवीणची कॅप्टनपदासाठी निवड केली आहे. प्रवीणच्या या अद्वितीय यशामध्ये प्रवीणचे वडील नंदलाल, आई संगीता, बहीण जान्हवी, पत्नी तन्वी व मुलगा ह्रिदान यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या मौलिक पाठिंब्यामुळेच मी कॅप्टनपदावर नियुक्त झालो, असे भावनिकतेने प्रवीणने सांगितले. प्रवीणची कॅप्टनपदावर नियुक्ती झाल्याबद्दल ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आप्पा शिंदे, आप्पा शिंदे क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत शिंदे, भारतीय सैनिकी विद्यालयाच्या शाळा समिती अध्यक्षा राजेश्वरी शिंदे, कल्याण-डोंबिवली महापालिका माजी नगरसेवक नवीन गवळी, कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अंकुर आहेर तसेच कल्याण डोंबिवलीमधील सर्व क्रीडा शिक्षक व नातेवाइकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT