मुंबई

मिसिंग लिंक वर्षाअखेर पूर्णत्‍वास!

CD

खोपोली, ता. १८ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटदरम्‍यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे. या लिंकमुळे दोन शहरांतील अंतर आठ किलोमीटरने कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी, नुकतीच मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी कामाचा आढावा घेत प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्‍यामुळे वर्षाअखेर प्रकल्‍पाचे काम पूर्णत्‍वास येण्याची शक्‍यता आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वांत लक्षवेधी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जात आहे. यासाठी १८० मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारला जात असून, यामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. सध्या प्रकल्पाच्या काम वायूगतीने सुरू असून, पावसाळा सुरू होण्याआधी प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण करायचे आहे. हा टप्पा अतिशय आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात हे काम करणे जिकिरीचे ठरणार आहे.

चार मार्गिकांवर दोन बोगदे
मिसिंग लिंक प्रोजेक्टअंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी ८.८७ किलोमीटर आहे, तर दुसरा बोगदा १.६७ किमी लांबीचा आहे. दोन्ही बोगद्यांची ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

खंडाळा घाटात १८० मीटर उंचीचा केबल-स्‍टेड पूल
सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पूल उभारणे मोठे आव्हान आहे. २०२४ मध्ये खंडाळा खोऱ्यात सुमारे १८० मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामास पावसाळ्यामुळे अडचणी आल्या होत्या. आता पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्याआधी हा आव्हानात्मक टप्पा पूर्ण करायचा आहे. प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे शहरातील अंतर आठ किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा जवळपास ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

‘वीर हुतात्मा शिंग्रोबा लेन’ नाव देण्याची मागणी
मिसिंग लेनला वीर हुतात्मा शिंग्रोबा यांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या काळात बोरघाटातून मार्ग दाखवणारे आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग बोरघाटाचे जनक म्हणून वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांना ओळखले जाते. त्यांचे सदैव स्मरण व्हावे, यासाठी बोरघाटात वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचे मंदिर बांधण्यात आले आहे. या महान हुतात्म्याचे सदैव स्मरण व्हावे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात नवीन तयार करण्यात आलेल्या मिसिंग लेनला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा लेन’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

द्रुतगती मार्गावरील दररोज वर्दळ (सरासरी)
हलकी वाहने ७२००
जड वाहने : २८०० ते ३०००
अति जड वाहने : ११२० च्या आसपास

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात मिसिंग लिंक प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT