मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन
माणगाव (बातमीदार) ः शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबिर सेवाभावी संस्थेतर्फे सलग नवव्या वर्षी के. ई. एम रुग्णालय, मुंबई यांच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने शिवजयंतीनिमित्त बुधवारी (ता. १९) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सरलादेवी मंगल कार्यालय हॉल, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे, सिद्धीनगर या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत हे शिबिर पार पडणार आहे. त्‍यामुळे रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबिर सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्या हस्ते व प्रमुख अतिथींच्या तसेच रक्तदात्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या शिबिराची जोरदार तयारी आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
...................
विकास कॉलनी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
माणगाव (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद विकास कॉलनी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडले. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा हर्षदा काळे, सभापती सुशीला वाढवळ, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, समाजसेविका दांडेकर, व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा शुभांगी येलवे आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून मुलांच्या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी देशातील विविधतेतून एकता, देशभक्तिपर गीते, लावणी, कोळीगीते, एकांकिका, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी तालुका व जिल्हा स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शुभांगी येलवे, शिक्षिका नीलम गायकवाड यांनी परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासे यांनी केले.
.................
मला हलक्यात घेऊ नका : सुनील तटकरे
खोपोली (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असूनही मी लोकसभेत भाजपच्या कोट्यातून तब्बल २५ मिनिटे भाषण देऊ शकतो. माझे दिल्लीतील वजन कमी समजू नका. मला हलक्यात तर बिलकूल घेऊ नका, असा मिश्कील इशारा रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांना दिला. त्यांचा रोख रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्‍यांकडे होता. सुनील तटकरे नुकतेच खोपोलीत एका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना राजकारणात काय किंवा जीवनात काय सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. खासकरून राजकीय क्षेत्रात बोलताना तारतम्य व सांभाळून बोलले म्हणजे भविष्यात कोणताही त्रास होत नाही व पश्चात्तापही होत नाही. आपली कोणत्याही विषयावर संवाद व चर्चा करण्याची तयारी असते, कारण संवाद व चर्चेतून अनेक गंभीर प्रश्न व समस्या सुटतात. या बाबी माझ्यावर ऊठसूट टीका करणाऱ्या मित्रांनी ध्यानात घ्यावी, असेही सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले.
..................
एक अग्निकुंड कार्यक्रम उत्‍साहात
पेण (बातमीदार) ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या पुण्यतिथीचे औचित्य साधून मराठी साहित्य मंडळ व अहिल्या महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर विचार जागृती मंच, मुलुंड प्रस्तुत एक अग्निकुंड सामाजिक प्रबोधन कार्यक्रम रामेश्वर हाॅल येथे उत्‍साहात पार पडला. कार्यक्रमात माधवी नातू यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. यानिमित्ताने जुन्या व नव्या पिढ्यांना एकत्रित स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलघडून पाहता आला. नवीन पिढीला या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच मुलुंड, तर्फे सुचेता नातू यांचे स्वागत मराठी साहित्य मंडळाच्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. देविदास बामणे व उपाध्यक्ष प्राचार्य सतीश पोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष विभावरी जौशी यांनी केले.
....................
शैक्षणिक साहित्याचे वाटप
माणगाव (बातमीदार) ः शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्‍या तळे व माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून मारुती फाउंडेशन समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीमध्ये अग्रेसर आहे. या संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक विद्यामंदिर रातवड शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, कंपास, पेन, पट्टी, खोडरबर, पॅड इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषद शाळेतर्फे मुख्याध्यापक सचिन कदम, शाळेतील शिक्षकवृंद, तसेच मुख्याध्यापक संतोष कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT