मुंबई

सहा शाळांच्या एकत्रीकणाच्या रोप्य महोत्सवाला प्रतिसाद

CD

सहा शाळांच्या एकत्रीकरणाच्या रोप्यमहोत्सवाला प्रतिसाद
माणगाव, ता. १८ (बातमीदार) ः रायगड विभागातील सहा शाळांमधील ज्ञानरचनावादी दृष्टिकोन ठेवून अध्ययन, अध्यापनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांचा प्रतिवर्षीप्रमाणे एकत्रीकरणाचा रौप्यमहोत्सवी मेळावा उत्‍साहात पार पडला. माध्यमिक विद्यामंदिर रातवड, अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द, सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी, गोळेगणी, वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव या सहा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या एकत्रीकरणात सहभागी झाले होते.
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, कोषाध्यक्ष विश्वास सोनवणे, सरचिटणीस डॉ. नीलेश रेवगडे, पर्यावरणतज्ज्ञ‍ अभिजित देशपांडे, रातवड शाळा शालेय समिती अध्यक्ष संजय पालकर, सदस्य ललित सारंग, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या एकत्रीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुस्वर आवाजात विद्यार्थ्यांनी ईशस्तवान व स्वागतगीत सादर केले. या एकत्रीकरणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी तज्ज्ञ‍ मार्गदर्शक उर्मिला जाधव, सदानंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणाची व्याप्ती, शिक्षकांनी करावयाची तयारी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण याविषयी पर्यावरणतज्ज्ञ‍ अभिजित देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण जतन संवर्धनात आपली भूमिका, हरित घर इत्यादीबाबत त्यांनी माहिती दिली. समारोपीय सत्रात डॉ. नीलेश रेवगडे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हाने याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित रायगड जिल्ह्यातील एकत्रीकरणाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रातवड विद्यालयाच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा रौप्यमहोत्सवी सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT