मुंबई

वसई-विरारकरांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

CD

वसई, ता. १८ (बातमीदार) : सध्या वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकांकडून पाचवा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार, याची उत्सुकता करदात्यांना लागली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.

वसई-विरार महापालिकेने गेल्या वर्षी २०२३-२४ वर्षाचा सुधारित आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण तीन हजार ११२.०७ कोटी आणि १०.३३ कोटी शिलकीचा हा अर्थसंकल्प होता. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. नवीन योजना अथवा अन्य सुविधांचा समावेश आहे का, हे स्पष्ट होणार आहे.

वसई-विरार महापालिकेने आरोग्यसेवा सक्षमीकणावर भर दिला. आरोग्य मंदिरांसह अन्य योजना आणल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणी कोणत्या स्वरूपाची असेल, तसेच शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे नवे पर्यायी मार्ग, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा याबाबत समावेश आहे का, हेदेखील समोर येणार आहे. सांडपाणी व्यवस्था, स्वछ्तेबाबत नवीन निर्णय काय असतील, हेदेखील समजणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी केली आहे का, याबाबत यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणे करामध्ये दिलासा दिला होता. यंदा महापालिकेने कोणती भूमिका घेतली आहे, याबाबत अर्थसंकल्पाची पाने उलगडल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT