मामा-भाचे डोंगरावर आग
वनमंत्र्यांकडे तक्रार; विशेष चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भाचे डोंगरावर लागलेल्या आगीबाबत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची विशेष चौकशी करावी, अशी मागणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने विजय त्रिपाठी यांनी केली आहे. तसेच अनधिकृत मजार, गाळे, कब्रिस्तानांवरदेखील कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी विजय त्रिपाठी यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भाचे डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती. तसेच ही जागा राष्ट्रीय उद्यानदेखील आहे. या उद्यानात असलेल्या निसर्ग संपत्तीचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र काही दिवसांपूर्वी या डोंगरावर भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम झाल्याची बाब विजय त्रिपाठी यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे. या परिसरात भारताचे एअर फोर्स स्टेशन आहे. हा भाग अत्यंत संवेदशनशील आहे. एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या परिसराचा दहशतवादी करवायांसाठी वापर केला जाण्याची माहिती दिली आहे.
वाढता अनधिकृत वसाहतींचा प्रभाव आणि नशा करणाऱ्या लोकांची उपस्थिती चिंतेचा विषय बनली आहे. अनेकदा या परिसरात अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरणीय स्थिरता धोक्यात आली आहे. आग लागण्याच्या या घटनेमुळे, या परिसरात असलेल्या वनस्पती आणि जीवसृष्टीवर गंभीर परिणाम झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि वसाहतींचा वाढत्या प्रभावामुळे स्थानिक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याशिवाय या परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे आग लागण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत तत्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे विजय त्रिपाठी यांनी निवेदनात म्हटले आहे.
कठोर कारवाई आवश्यक
घटनेची गंभीरतेने दखल घेत तत्काळ चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा घालता येईल. वन विभागाने या परिसरातील अनधिकृत वसाहतींविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग संपत्तीचे संरक्षण होईल, असे या निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.