मुंबई

शिवजयंतीला सामाजिक, सांस्‍कृतिक कार्यक्रमांची बरसात

CD

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक, सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त सामाजिक सेवा संस्था व मेडी कव्हर रुग्‍णालयाच्या विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत सानपाडा येथे आरोग्य तपासणी व दाखलेवाटप शिबिराचे आयोजन केले आहे. बुधवारी सानपाडा सेक्टर सहा येथे सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा राजेश ठाकूर यांच्या वतीने आरोग्य तसेच मोफत नेत्रचिकित्‍सेसह मोफत चष्मेवाटप करण्यात येणार आहे. तसेच विविध आजारांच्या तपासण्याही करण्यात येणार आहेत.
कोपरखैरणेमध्ये गर्जना मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवारी मध्यरात्री ‘पाळणा बाळ छत्रपती शिवरायांचा’ या विशेष कार्यक्रमाने सुरू होणार आहे, तर बुधवारी सकाळी शिवज्योत आगमन, अभिषेक व प्रतिमा पूजन, तसेच सायंकाळी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानंतर रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती होईल. या कार्यक्रमात ह.भ.प. चैतन्य महाराज पाडळे यांचे प्रेरणादायी प्रवचन होणार आहे.

नेरूळमध्ये वैचारिक शिवजयंती महोत्सव
नेरूळमधील दुर्गमित्र परिवार आणि शिवशंभो जन्मोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस वैचारिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील घोलप यांनी सांगितले. मंगळवारी रांगोळी स्पर्धा, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रकला स्पर्धा, तर सायंकाळी सहा वाजता शाहिरी पोवाडे व देवीचा गोंधळ, असे कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सकाळी शिवज्योत आगमन होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ ते रात्री ११ दरम्यान शिवकालीन शस्‍त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता ‘शिवराय ः भाग्य देशाचे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे, तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन, तर रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

एपीएमसीत व्याख्यान
तुर्भे येथे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवन विद्या’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्‍याची माहिती भाजीपाला बाजारपेठेचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. श्री सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, उपासनायज्ञ संगीत जीवन विद्येसह नामसंकीर्तन, रात्री श्री वामनराव पै यांचे शिष्‍य, व्याख्याते भरत पांगारे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवन विद्या या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT