मुंबई

जप्त वाहनांचा ऑनलाईन लिलाव

CD

जप्त वाहनांचा ऑनलाइन लिलाव
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहे. विभागाच्या वायुवेग पथकाने जप्त केलेल्या वाहनांमध्ये बस, रिक्षा टॅक्सी लाइट मोटर व्हेइकल यांचा समावेश आहे.
आरटीओच्या वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी विविध कारवायांत अनेक वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे, भाईंदर, शहापूर, मुंब्रा, भिवंडी येथील जागेत ठेवली असून, त्यामध्ये बस, रिक्षा, टॅक्सी, हलकी वाहने अशा प्रकरच्या १८ वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे मालक, वारस आढळून येत नसल्याने ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ५ मार्चला सकाळी ११ वाजता त्यांचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव केला जाणार आहे. इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती लिलावाच्या अगोदर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT