मुंबई

स्वागत यात्रेत घडणार विविध समाजांचे दर्शन

CD

स्वागत यात्रेत घडणार विविध समाजांचे दर्शन
कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी समाजाचा समावेश
ठाणे, ता. १८ : शहरात मराठी नववर्षानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी, अग्रवाल अशा विविध समाजांच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. स्वागत यात्रेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थिती लावत आमचाही या यात्रेत सहभाग असल्याचे सांगत आहेत. काहींनी आमच्या संस्कृतीचा चित्ररथ यात्रेत सहभागी केला जाईल, असेही नमूद केले आहे. त्यामुळे यंदाची यात्रा ही वैविध्यतेने नटलेली पाहायला मिळणार आहे.

ठाणे शहरातील श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे आहे. त्यामुळे यंदा या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वागत यात्रेची तयारीदेखील आयोजकांनी चार महिने आधीपासून सुरू केली आहे. यंदाची यात्रा भव्य स्वरूपात व्हावी, यासाठी आयोजकांकडून विविध संस्था आणि समाजाला यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यापूर्वी यात्रेत अवघे काही समाज सहभागी होत होते. परंतु या यात्रेबाबत होत असलेला प्रचार-प्रसार पाहून आता विविध समाज या यात्रेशी जोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कोळी, धनगर, वडार, मातंग, राजस्थानी, अग्रवाल, माळी, बंजारा असे विविध समाज यंदाच्या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. या समाजांचे प्रतिनिधी स्वागत यात्रेच्या बैठकीत येत असून, त्यांचा या यात्रेत कशा स्वरूपात सहभाग असणार आहे याची माहिती देतात. काही समाज हे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ साकारणार आहेत, तर काही जण त्यांच्या समाजाची वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासमार्फत देण्यात आली.

उपयात्रा वाढण्याची शक्यता
शहराच्या मुख्य यात्रेत कानाकोपऱ्यातील मंडळींना सहभागी होणे शक्य होत नाही. तसेच ही यात्रा केवळ एका भागापुरती मर्यादित राहून नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून काही भागातील नागरिक आणि संस्था न्याससोबत जोडून उपयात्रा काढत आहेत. कळवा, ठाणे पूर्व, शिवाईनगर, पोखरण रोड नंबर १, घोडबंदर, वाघबीळ, ढोकाळी आणि लोकमान्यनगर अशा आठ उपयात्रा निघतात; परंतु यातील काही यात्रांचा मार्ग खूप मोठा असल्यामुळे या यात्रांमध्ये दोन तुकड्या पाडण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. त्यामुळे यंदा उपयात्रा वाढणार असल्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
शहरात मराठी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे. या सोमवारी (ता. १७) आयोजित केलेल्या स्वागत यात्रेच्या बैठकीला आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी ते म्हणाले की ही केवळ यात्रा नसून संस्कृती, परंपरा आणि धर्माची एक चळवळ आहे. त्यामुळे या यात्रेची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच यंदा यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्षे आहे. या यात्रेविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असून, त्यांना या यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे डावखरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT