पोलिसांवर जमावाकडून दगडफेक
भिवंडीत एक जण जखमी; गाडीचे नुकसान
भिवंडी, त .१८ (वार्ताहर) ः भिवंडी शहरात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर स्थानिक जमावाने सोमवारी (ता. १७) रात्री दगडफेक केली. त्यात एक पोलिस जखमी झाला असून, पोलिस वाहनाचे नुकसान झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवीनगर कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमध्ये मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून झालेल्या भांडणात आई-वडील व अल्पवयीन मुलीस मारहाण करण्यात आली. या वेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अल्पवयीन मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यास मिळताच पोलिसांनी रुग्णालयात दाखल होऊन अल्पवयीन मुलीचा जाबजबाब घेतला. गुन्ह्यातील आरोपी वऱ्हाळ देवीनगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती समजल्याने पोलिस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले. या वेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलिस पथकासोबत अरेरावी करत त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता ३० ते ४० जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलिस वाहनावर दगडफेक करीत हल्ला चढवला. यामध्ये पोलिस शिपाई तडवी यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. या वेळी जमावाने पोलिस जीपवरसुद्धा हल्ला चढवल्याने जीपचे नुकसान झाले आहे. तडवी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
...
४० जणांविरोधात गुन्हा
नारपोली पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईकडून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार यांनी सरकारी कामात अडथळा करून आरोपीला पकडण्यास अटकाव करून हल्ला केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन ऊर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे व इतर ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.