मुंबई

राजीव गांधी टाऊन हॉलचे काम प्रगतीपथावर

CD

राजीव गांधी टाऊन हॉलचे काम प्रगतिपथावर
येत्या सहा महिन्यांत काम होणार पूर्ण; २२ कोटी रुपये खर्च
उरण, ता. १८ (वार्ताहर)ः नगरपालिका हद्दीतील राजीव गांधी टाऊन हॉलचे निधीअभावी रखडलेले काम आता प्रगतिपथावर आले आहे. येत्या सहा महिन्यांत त्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना आपल्या हक्काचे अद्ययावत सभागृह मिळणार आहे.
उरण नगरपालिकेने १९८९-९० रोजी राजीव गांधी सभागृहाची नागरिकांच्या सोयीसाठी निर्मिती केली होती. त्या जुन्या सभागृहाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते करण्यात आले होते. भव्यदिव्य असणाऱ्या सभागृहात विविध नाटकांचे नाट्यप्रयोग, लग्न समारंभ विविध राजकीय पक्षांच्या सभा, शासकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचनालय आदींची सतत रेलचेल असते, मात्र इमारत जुनी झाल्याने सभागृहाची पडझड झाली होती. सभागृहाच्या दयनीय अवस्थेमुळे यामध्ये साप, विंचू, घुशी यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. पर्यायाने जनतेने येथे कार्यक्रम घेणे बंद केले होते. मोडकळीस आलेल्या या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुुरुवातीला सभागृहासाठी २०१६ ला १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. २०१७ मध्ये नगरपालिकेकडून सपाटीकरण करून भूमिपूजन करण्यात आले. इमारत अद्ययावत करण्यासाठी टेंडरमध्ये वाढ करून २०२१ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. त्‍यामुळे १२ कोटी रुपयांवरून इमारतीचा बांधकाम खर्च तब्बल २२ कोटी रुपयांपर्यंत गेला. त्‍यामुळे कमी पडत असलेला निधी मिळविण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेतला. सध्या हे काम प्रगतिपथावर आले आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम येत्या दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे, तर उर्वरित बांधकाम हे येत्या सहा महिन्यांत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या बांधकाम विभागातून देण्यात आली आहे. त्यामुळे उरणकरांना आपले हक्काचे अद्ययावत असे सभागृह मिळणार आहे.
....................
पहिल्या सुरुवातीला अडथळे निर्माण झाले होते, मात्र आता निधी मिळत असल्याने काम प्रगतिपथावर आहे. या टाऊन हॉलच्या इमारतीचे बांधकाम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.
-निखिल धोंडे, नगरपालिका, शहर अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT