मुंबई

किरकोळ वादातून पत्नीची आत्महत्या

CD

मनोर, ता. १८ (बातमीदार) : कमी पगारात आर्थिक खर्च भागत नसल्याने मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर गावाला जाऊन राहण्याचा निर्णय पतीने घेतला होता. या कारणाचा राग आल्याने त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मनोरमध्ये घडला आहे.

धनमंतीदेवी नवलेश कुमार पासवान (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती मनोरच्या रईस नगरी भागातील नासिमा कॉम्प्लेक्समध्ये कुटुंबासह राहत होती. पगारात भागत नसल्याने मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर गावाला जाऊन राहण्याचा विचार असल्याच्या चर्चेदरम्यान धनमंतीदेवी हिचा पती नवलेश कुमार पासवान याच्यासोबत वाद झाला होता. मंगळवारी (ता. १८) सकाळी पती कामाला आणि मुले शाळेत गेल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धनमंतीदेवी हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. या वेळी आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने धनमंतीदेवीला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी महिलेचा पती नवलेश कुमार चंद्रिका पासवान याने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT