मुंबई

रायगडमध्ये सर्वत्र शिवजागर

CD

रायगडमध्ये सर्वत्र शिवजागर
अलिबाग, ता. १९ ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रायगडमध्ये मोठ्या उत्‍साहात पार पडली. या वेळी जिल्‍ह्यातील विविध भागात सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी शोभा यात्रा, बाइक रॅली मोठ्या धुमधडाक्‍यात काढण्यात आली होती, तर कुठे शिवरायांच्‍या कर्तृत्‍वाचा जागर करण्यात आला. अनेक ठिकाणी शिवव्याख्याते यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बच्चेकंपनीसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्‍साह अनेक ठिकाणी दिसून येत होता. विशेष म्‍हणजे जिल्‍ह्यात सर्वत्र शिवजयंती अगदी आनंदात, उत्‍साहात आणि शांततेत पार पडली.

खोपोली शहर झाले शिवमय
खोपोली (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खोपोली व संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात विविध सांस्‍कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले. जयंतीनिमित्त खोपोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी १० वाजता खोपोली नगरपालिका मुख्य दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. पंकज पाटील व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. अकरा वाजता शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, डॉ. सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, राजू गायकवाड, ज्येष्ठ माजी नगरसेवक मोहन औसरमल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, सर्व पक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यापूर्वी रात्री १२ वाजता शहरातील शिवप्रेमी व सामाजिक संस्था कार्यकर्ते व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना ढोल नगारे वाजवून अभिवादन करून महाआरती केली. तालुक्यातील विविध ग्रामपंचायती व शहरातील भव्य शोभा यात्रा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून काढण्यात आल्या. दुचाकी व चारचाकी वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांचे भगव्या झेंडे लावून गल्लोगल्ली मिरवणुका काढण्यात आल्या. संध्याकाळी खोपोली नगरपालिका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौक शिळफाटा ते खोपोली गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अशी भव्य शोभा यात्रा मिरवणूक आयोजित करण्यात आली.
...................
पोयनाडमध्ये शिवजयंतीचा उत्साह
पोयनाड, ता. १९ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात विविध गाव-पाड्यात १९ फेब्रुवारी रोजी दिवसभर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. यानिमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विविध गावांमधील अनेक तरुण शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रायगड, किल्ले कुलाबा, प्रतापगड, राजगड येथे गेले होते. तेथून धावत शिवज्योत आपापल्या गावात आणून तिचे स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक, भजन, हरिपाठ, स्वच्छता मोहीम यासारखे कार्यक्रम पार पडले. सायंकाळच्या वेळेस पोवाडा, महिलांसाठी विविध स्पर्धा, व्याख्यान यासारखे कार्यक्रम उत्‍साहात झाले. परिसरातील पेझारी बांधण, ताडवागळे, मेढेखार, शहापूर, हाशिवरे, पेढांबे, वाघ्रण, विरवाडी, खिडकी, तीनवीरा, नारंगी आदी गावांमध्येदेखील शिवजयंती उत्‍साहात पार पडली. ऐतिहासिक किल्ला सागरगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकाचा पूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सागरगड दुर्गसेवक सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिसरातील ६० हून अधिक दुर्गसेवक उपस्थित होते.
..........................
उमरोली येथे शिवज्योतचे स्वागत
माणगाव (बातमीदार) ः माणगाव तालुक्यातील उमरोलीतर्फे खरवली येथे धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता किल्ले रायगडवरून ज्योत वाजतगाजत मौजे उमरोली गावात आणण्यात आली. मोठ्या उत्साहात उमरोलीकरांनी शिवज्योतचे स्वागत केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ उमरोलीकडून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हे पाचवे वर्ष असून, सत्यनारायण पूजेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी महाप्रसाद झाल्यानंतर प्रदर्शित झालेला ''छावा'' चित्रपट प्रोजेक्टरच्या सहाय्याने दाखवण्यात आला. या वेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
...............
गावागावात विद्यार्थ्यांची उत्‍साहात रॅली
कर्जत (बातमीदार) ः तालुक्यातील नांगुर्ले गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा तिघरच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जयघोषात गावातून भव्य रॅली काढली. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेत "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिरासमोर प्रभावी पथनाट्य सादर केले. या माध्यमातून त्यांनी शिवरायांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि लोककल्याणकारी धोरणे यांचा प्रभावी संदेश दिला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक इंगळे, पजई, खडे आणि वाघ यांनी उपस्थिती लावली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना शिवरायांच्या विचारांवर चालण्यासाठी मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे इतिहासाची जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले.
..................
धाटाव औद्योगिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
रोहा (बातमीदार) ः रोहा धाटाव औद्योगिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण व जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत महाराजांबद्दलचा आदर व्‍यक्‍त केला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एस. पाटील, सहाय्यक शिक्षक हणमंत चव्हाण, जनार्दन पिंगळे, रविंद्र कान्हेकर, भरत वारगुडे, लता मोरे, कविता कांबळे, राजेंद्र जाधव, सुरेश भगत, प्रशांत घरत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धाटाव औद्योगिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोवाडा, वेशभूषा स्पर्धा आदी सांस्‍कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT