मुंबई

लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

CD

लोकसहभागातून स्वच्छता मोहीम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जनआक्रोश समितीचा उपक्रम
वडखळ, ता. १८ (बातमीदार) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेली माती, खडी आणि धूळ यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्‍यामुळे जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
दुचाकीस्वारांसाठी खडी आणि धूळ अतिशय धोकादायक ठरत आहे. मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करताना या खडीमुळे घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वडखळ येथील पुलाप्रमाणे सर्वच ठिकाणी धोकादायक परिस्‍थिती निर्माण झाली आहे.
कासू येथील पुलाची स्वच्छता करून नागरिकांनी या सामाजिक कार्यात हातभार लावला. महामार्गावरील सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग दोन्ही आवश्यक आहे. त्‍यामुळे अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जनआक्रोश समितीचे चैतन्य पाटील यांनी केले आहे.

शिवप्रेमींची काळजी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रायगडावरून मोठ्या संख्येने मावळे ‘शिवज्योत’ घेऊन येतात. त्यातील काही मावळे अनवाणी असतात. महामार्गावरील खडी त्यांच्या पायाला लागू नये, तसेच कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT