मुंबई

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

CD

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर): मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी उरणमधील नवीन शेवा गावाकडे जाणाऱ्या रोडवर घडली. उरण पोलिसांनी या दुर्घटनेतील अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या दुर्घटनेतील मृत व्यक्तीचे नाव धर्मपालसिंग सुखवासी बाल्मिकी (४९) असे असून, ते नवीन शेवा येथील तेलीपाडा गावात राहत होते. ते एका खासगी कंपनीत नोकरीस होते. धर्मपालसिंग हे दरदिवशी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात होते. मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारासदेखील धर्मपालसिंग मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. या वेळी ते तेलीपाडा गावाच्या कमानीपासून १०० मीटर पुढे गेले असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना धडक देऊन पलायन केले. काही वाहनचालकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी धर्मपालसिंग यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT