मुंबई

लोखंडी रॉडने मारहाण करून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

CD

लोखंडी रॉडने मारहाण करून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) ः महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अमानुष मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतन नाडार असे आरोपीचे नाव आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथे राहणारी २० वर्षीय तरुणी कोपरी येथील एका महाविद्यालयात शिकत आहे. यासोबतच ती डोंबिवलीत राहणाऱ्या संतन राज नाडार (वय ४५) याच्या कोपरीतील वर्कशॉपमध्ये ॲनिमेशनचे अर्धवेळ काम करते. महाविद्यालयातील मित्रांसोबत तिने बोलू नये, असा दबाव तो तिच्यावर आणत असे. तसेच ‘तुझ्या मोबाईलमधील मित्राचे फोटो तुझ्या आई-वडिलांना दाखवेन, तुझे लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत असे. कोपरीत नवे दुकान घेतले, असे सांगून त्याने तिला मंगळवारी (ता. १८) दुकानात बोलावले आणि शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला तिच्या मित्राच्या कारणावरून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर तिला थंड पाण्याने अंघोळ घालून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत कोणाला सांगितले, तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. जखमी झालेल्या गंभीर अवस्थेत पीडित मुलगी घरी आली असता तिच्या आई-वडिलांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लोखंडी रॉडने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या असून, गंभीर अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT