मुंबई

एप्रिलपासून म्हाडाचे नागरी सुविधा केंद्र सुरू होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : म्हाडा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना आपला तक्रार अर्ज एकाच ठिकाणी देता यावा, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी वेगवगेळ्या विभागांत फेऱ्या माराव्या लागू नयेत, म्हणून म्हाडाकडून अत्याधुनिक नागरी सुविधा केंद्र उभारले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी दररोज येथे चार ते पाच हजार नागरिक येतात. एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्याची दखल घेत म्हाडाने नागरी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिसेंबरपासून म्हाडा मुख्यालयातील गेट क्रमांक ४ येथे या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. त्याचे काम मार्चअखेरीस पूर्ण होऊन एप्रिलपासून हा कक्ष सुरू होणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनीही भेट देत कामाची पाहणी केली आहे.

एकाच ठिकाणी माहिती मिळणार

नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल या नागरी सुविधा केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला स्कॅन करून पाठवण्यात येणार आहेत. तसेच या अर्जावर काय कारवाई झाली, याची माहितीही संबंधितांना नागरी सुविधा केंद्रातच मिळू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांची वेगवगेळ्या कार्यालयांत फेऱ्या मारण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. तसेच नागरिकांच्या शंका, प्रश्नांना योग्य उत्तर देण्यासाठी तेथे सक्षम अधिकारीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT