मुंबई

दहा लाख कोटींची कर्नाटकात गुंतवणूक

CD

दहा लाख कोटींची कर्नाटकात गुंतवणूक
‘ग्लोबल इन्व्‍हेस्टमेंट मीट’मध्ये घोषणा
मुंबई, ता. १७ : कर्नाटक राज्यात नुकताच चार दिवसांचा ‘ग्लोबल इन्व्‍हेस्टमेंट मीट २००५’ हा सर्वात मोठा गुंतवणूक मेळा पार पडला. अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि भविष्यातील दळणवळण साधने यांसारख्या विविध उद्योगांनी सुमारे १० लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीची घोषणा या वेळी केली. यामुळे आगामी वर्षांत राज्यात सुमारे सहा लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्याचे मोठे आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
भव्‍य गुंतवणूक मेळ्यात ७५ हून अधिक जागतिक ख्यातीचे वक्ते, ३० हून अधिक सत्रे आणि जगभरातील पाच हजारांहून अधिक उद्योग आणि विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. औद्योगिक आणि आर्थिक विकासात कर्नाटकला अग्रस्थानी नेण्याच्या उद्देशाने अवकाश क्षेत्र, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि अत्याधुनिक उत्पादनावर सरकारकडून भर देण्यात येत आहे. टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू एनर्जी, हिरो फ्युचर एनर्जीज, एक्साईड, फॉक्सकॉन आणि एअर इंडिया या निवडक उद्योगांनी राज्यात मोठी गुंतवणूक केलेली आहे. या मेळ्यात फ्युचर ऑफ इनोव्‍हेशन एक्स्पोद्वारे नवकल्पनांचे आदान-प्रदान, नवसंशोधन आणि तंत्रज्ञानासोबत कर्नाटक राज्याच्या गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून पायाभूत सुविधा आणि क्षमतांची ओळख करून देण्यात आली.
---
दोन हजार एसएमईंना प्रशिक्षण
कर्नाटक सरकारने लघु आणि मध्यम उद्योगांना बळ देण्यासाठी ‘एसएमई कनेक्ट’ आणि ‘वेच्युराईज ग्लोबल स्टार्टअप चॅलेंज’ हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या राज्यातील दोन हजारहून अधिक लघु आणि मध्यम उद्योगांना इंडस्ट्री ४.० टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देऊन त्यांना डिजिटल व्‍यासपीठावर आणून उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT