पालघर, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज (ता. १९) ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जागर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या वेशभूषेतून ऐतिहासिक दृश्ये उभी केली तसेच आकर्षक पारंपरिक वेशभूषेत नृत्य आणि लेझीम पथकाने उत्साह वाढवला. संपूर्ण पालघर शिवमय झाले होते. विशेष म्हणजे प्रथमच मोठ्या प्रमाणात ही पदयात्रा काढण्यात आली. याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या प्रसंगी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व सहभागी नागरिकांसाठी डिजिटल सर्टिफिकेटची सोय केली होती. एक विशेष क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी लाइफ क्लब सफाई संघटनेचे सदस्य आणि लेझीम पथकाने मोलाची भूमिका बजावली.
तहसील कार्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार सचिन भालेराव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) संगीता भागवत तसेच अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.