मुंबई

दादर येथील हिंदू स्मशानभूमीत प्रार्थनागृह, स्वच्छतागृह वाढवा

CD

दादर येथील हिंदू स्मशानभूमीत
प्रार्थनागृह, स्वच्छतागृह वाढवा

महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीत सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची तसेच स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच स्मशानभूमी परिसरात हिरवळ लागवडीसह उत्तम नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर येथील स्मशानभूमीमध्ये बुधवारी भेट देऊन नागरी सेवा-सुविधांची पाहणी केली. उपआयुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते. स्मशानभूमीत असलेली दफनभूमी, दहनवाहिनी, केश कर्तनालय, प्रार्थनागृह तसेच येथील विविध इमारतींची गगराणी यांनी भेटीदरम्यान पाहणी केली. स्मशानभूमीची कार्यप्रणाली, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा तसेच नागरिकांच्या काही सूचना किंवा तक्रारी आहेत का, याबाबत माहिती अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील का, याबाबतही विचार करून कार्यवाही करावी, असे निर्देशही आयुक्तांनी या वेळी दिले.
-------
अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता सध्या येथे उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांच्या संख्येत वाढ करावी. ही प्रार्थनागृहे नावीन्यपूर्ण आणि कल्पकतेने बांधवीत. सध्या स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने तसेच विद्युत दहनवाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी लाकूड इंधन म्हणून वापरण्याऐवजी अन्य काही स्रोतांचा वापर करता येईल का, याचाही अभ्यास करण्यात यावा.
- भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT