सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : डोंबिवलीतील ज्येष्ठ डॉ. प्रमोद बेजकर, मेल एक्स्प्रेसचे लोको पायलट गणेश कुलकर्णी यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेंतर्गत देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. डॉ. बेजकर यांच्या ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ या पुस्तकाला राज्य वाङ्मय पुरस्कारातील बाल वाङ्मय विभागातील ५० हजार रुपयांचा युदनाथ थत्ते पुरस्कार आणि गणेश कुलकर्णी यांच्या ‘रुळाळुबंध’ पुस्तकाला ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मुंबईत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
४२ वर्षीय डॉ. बेजकर डोंबिवलीत ठाकुरवाडी येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत ३० वर्षांपासून कविता, गाणी, गझल, भावगीत अशा वेगळ्या ढंगांमध्ये ते लिखाण करत आहेत. त्यांचे विनोदी ढंगातील लेख, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘कॉलेज के दिन’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. ‘अलगद’ हा अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला, ‘इंद्रधनु’ हा अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेला भावगीतांचा अल्बम आहे. काही मराठी चित्रपटांत त्यांनी गाणी लिहिली आहेत. शरीर हे विलक्षण यंत्र आहे. त्यात अब्जावधी पेशी काम करतात. शरीराच्या अजबखान्याविषयी मुलांना जांभई, उचकी, ढेकर, शिंक, तिरळेपणा, तोतरेपणा का येतो, अशा अनेक गोष्टींविषयी माहिती ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ या पुस्तकात आहे.
डोंबिवलीतील साहित्यप्रेमी गणेश कुलकर्णी यांनी पश्चिम रेल्वेमध्ये मेल, एक्स्प्रेसचे लोको पायलट म्हणून ३५ वर्षे नोकरी केली. आता ते चर्चगट येथील सुरक्षा विभागात मुख्य लोको निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लोकल, मेल-एक्स्प्रेस चालवणाऱ्या माणसांचे आयुष्य कसे असते. रेल्वे चालकाचा भवताल किती कठीण असतो. लोकल, मेल चालविणाऱ्या माणसांविषयी सामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल असते. ते कुतूहल ‘रुळाळुबंध’ या पुस्तकातून प्रकट करण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.