मुंबई

बदलापुरात पहिल्यांदाच महाराजांची महाआरती

CD

बदलापुरात पहिल्यांदाच महाराजांची महाआरती
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : उल्हास नदीच्या काठावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १८) करण्यात आले. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी आमदार किसन कथोरे व कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत बदलापूरकरांच्या साक्षीने पहिल्यांदाच शिवरायांची महाआरती करण्यात आली. पुढल्या वर्षी याच ठिकाणी तीनदिवशीय महाशिवजयंतीचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी या वेळी केले.

उपस्थित मान्यवरांनी महाआरतीच्या रूपाने शिवरायांचा जागर केला. महाआरतीनंतर या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपस्थित बदलापूरकरांनी आमदारांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमाचे जोरदार स्वागत केले. लहान मुलांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार किसन कथोरे यांनी म्हटले, की ऐतिहासिक वारसा असलेल्या बदलापूर शहराला सांस्कृतिक शहराची ओळख प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचा इतिहास अजरामर करणाऱ्या महापुरुषांचे पुतळे उभारून शहराला एक वेगळी ओळख देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाचे अनावरण करण्यात आले. पुढच्या वर्षी याच ठिकाणी तीन दिवसांचा कार्यक्रम घेऊन महाशिवजयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाआरती कार्यक्रमाला माजी नगरसेवक संभाजी शिंदे, शरद तेली, राजेंद्र घोरपडे, राजश्री घोरपडे आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार

Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

SCROLL FOR NEXT