जव्हार (बातमीदार) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपातळीवर विकासासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. त्या अनुषंगाने जव्हार तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न सुटावेत, याकरिता जव्हार तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. २७) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत जनता दरबार आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे. या उपक्रमाला अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हेमंत सवरा हे राहणार आहेत, तर आमदार हरिश्चंद्र भोये हे प्रमुख पाहुणे असतील. जव्हार तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न, सार्वजनिक समस्या याबाबत निवेदन अथवा सूचना असल्यास या जनता दरबारात मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.