मुंबई

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथील मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे ढीग

CD

ज्वेल्स ऑफ नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे ढीग
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) ः ज्वेल्स ऑफ नवी मुंबई म्‍हणून संबोधल्या जाणाऱ्या पाचबीच मार्गावरील सेक्टर २८ येथील मोकळ्या भूखंडाचा कचराकुंडीप्रमाणे उपयोग केला जात आहे. कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचरा उचलण्याऐवजी ठरावीक दिवसांनी तो पेटवून दिला जात आहे. त्‍यामुळे या धुराचाही त्रास स्‍थानिकांना होत असल्याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
स्वच्छतेसाठी महापालिकेने शहरभर विशेष अभियान राबविले आहे. विविध उपक्रम राबवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे; परंतु काही ठिकाणी नागरिक नियमांचे पालन न करता जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत. यामुळे शहराला विद्रूपीकरण येत असून परिसर अस्‍वच्‍छ होत आहे. नेरूळ सेक्टर २८ येथील रेणुका देवी इमारतीपासून ते सीवूड्सच्‍या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. रोज सकाळ व सायंकाळी ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे फेरफटका मारण्यासाठी जाणारे नागरिक कचरा पाहून नाराजी व्यक्त करीत आहेत. रोगराई पसरू नये, यासाठी येथे त्वरित सफाई करावी, तसेच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश माने यांनी केली आहे. विशेष म्‍हणजे, पालिकेकडून येथील कचरा उचलण्याऐवजी जाळून टाकण्यात येत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT