रसायनाच्या उग्र वासाने खारघर, तळोजावासी त्रस्त
खारघर, ता. २५ (बातमीदार) : तळोजा एमआयडीसीमधून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या रसायनाच्या उग्र वासामुळे तळोजा, नावडे, रोडपाली खारघर परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटे परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून पसरणाऱ्या वायू प्रदूषणामुळे डोळे चुरचुरणे, अस्थमा, दमा अशा विविध आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खारघर, तळोजा, रोडपाली आणि खारघरवासीयांनी अनेक वेळा मोर्चा, आंदोलन तसेच प्रदूषण महामंडळ आणि लोक आयुक्तांकडे लेखी पत्र दिले आहे; मात्र अद्यापही कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रदूषण महामंडळाच्या तळोजा विभागीय कार्यालयात एमआयडीसीमधून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषणाविषयी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी सूचना केली होती. दरम्यान, मंगळवारी रात्री सोडण्यात आलेल्या केमिकलच्या उग्र वासामुळे अनेकांची झोपमोड झाली. पहाटे आठ वाजेपर्यंत परिसरात उग्र वास पसरल्यामुळे रहिवाशांना दरवाजा, खिडक्या बंद करून घ्याव्या लागल्या. तर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना पसरलेल्या दुर्गंधीमुळे माघारी यावे लागले. याविषयी प्रदूषण महामंडळाचे विभागीय अधिकारी सतीश पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.