मुंबई

एकल महिलांचा उद्योजक बनण्याचा निर्धार

CD

एकल महिलांचा उद्योजक बनण्याचा निर्धार
मालाड, ता. २६ (बातमीदार) ः व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एकल महिलांच्या सहलीचे आयोजन सोमवारी (ता. १७) सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी आणि काचपाडा यांच्या वतीने मार्वे, मनोरी येथे करण्यात आले होते. या वेळी ४० महिला व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मनोरी किनाऱ्यावर विविध खेळांच्या माध्यमातून या महिलांना सामाजिक एकोपा आणि धार्मिक ऐक्य याबाबत माहिती देण्यात आली. अफवांवर विश्वास न ठेवता त्यांची चाचपणी आणि अफवा कशी ओळखायची याबाबतही माहिती देण्यात आली. त्‍यानंतर एकल महिलांनी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत मनसोक्त आनंद लुटला. एकल महिलांनी येत्‍या काळात घरकाम अथवा नोकऱ्यांवर अवलंबून न राहता उद्योजक बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्धार केला. ज्‍येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम, लालजी कोरी, अनिता खरात आणि प्रदीप खरात यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर केक कापून व्हॅलेंटाइन डे साजरा केल्‍याचे सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या सचिव वैशाली महाडिक यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वरी शर्मा, मेरी चेट्टी, मेघना धनावडे, वीणा धर्माधिकारी, विरंगना साळवे आदींनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT