खर्डी, ता. २५ (बातमीदार) : गहाण ठेवलेले लाखोंचे दागिने सराफा व्यापारी घेऊन फरार झाल्याचा प्रकार वासिंद पूर्वेकडे घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांची दोन पथके राजस्थानकडे रवाना झाली आहेत.
वासिंद पूर्वेतील अष्टविनायक ज्वेलर्समध्ये विजय भोंडवे यांनी ६२ ग्रॅम वजनाचे म्हणजे जवळपास दोन लाख ४८ हजारांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. व्याजाची रक्कम भरल्यानंतर वर्षभरानंतर भोंडवे गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी दुकानामध्ये गेले असता दुकानाला टाळे असल्याचे दिसून आले. या वेळी चौकशी केली असता दुकानाचा मालक शंकरलाल पटेल हा पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे भोंडवे यांनी वासिंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वासिंदमधील जवळपास ३५च्या आसपास ग्राहकांना अशाचप्रकारे गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दुकानदाराकडे पैसे दामदुप्पट करण्याच्या प्रलोभनातून दागिने गहाण ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
-------------------------------
दागिन्यांसाठी हेलपाटे
खर्डी येथेही चार वर्षांपूर्वी एक ज्वेलर्स मालक ग्राहकांचे गहाण ठेवलेले दागिने व रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने फरार झाला होता. याप्रकरणी तीन वर्षांनी मुख्य सूत्रधाराला पकडण्यात आले; पण फसवणूक झालेल्या ग्राहकांना त्यांचे दागिने मिळाले नसल्याने आजही हेलपाटे मारावे लागत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.