सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : पुष्पा चित्रपटात दुधाच्या वाहनातून चंदनाची तस्करी केल्याचे दृश्य दाखविण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठाण्यातदेखील अवैध मद्याची वाहतूक करण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला आहे. सिमेंट मिक्सर वाहनामधून गोवानिर्मित परराज्यातील भारतीय बनावटीच्या मद्याच्या वाहतुकीचा डाव राज्य ठाणे भरारी पथकाने उधळून लावला. या कारवाईत ५९५ बॉक्स आणि सिमेंट मिक्सर असा ६६ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मोहन शंकरजी जोशी या चालकाला अटक केली. ही कारवाई नवी मुंबईतील बेलापूर येथे मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार ठाणे भरारी पथक नवी मुंबईतील बेलापूर येथून सीबीडी - डी. वाय. पाटील मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना संशयित दहाचाकी सिमेंट मिक्सर वाहनाला थांबवले. त्याची तपासणी केली असता, परराज्यातील भारतीय बनावटीचे मद्य आढळून आले. या वाहनाच्या आतमध्ये ५९५ बॉक्स लपवून ठेवल्याचे सापडून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.