सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ३५वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा, ठाणे शनिवार (ता. २२) पासून सुरू झाल्या आहेत. त्याची औपचारिक सुरुवात गुरुवारी (ता. २७) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. या स्पर्धांच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अॅथलेटिक्स, फूटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो स्पर्धा आयुक्तालयात होणार आहे. कबड्डी, तायक्वांदो, दु-शु, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, क्रॉसकंटी व जलतरण अशा १८ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस विभागातील एकूण १३ संघ सहभागी झाले असून, त्यात दोन हजार ३२३ पुरुष आणि ६०६ महिला खेळाडू असे एकूण दोन ९२९ खेळाडूंनी भाग घेतला आहे. १ मार्चला मुख्यमंत्र्यासह महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या प्रमुख, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला; तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंची व्यवस्था
स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची एम.एम.आर.डी.ए. क्वॉटर्स, भाईंदरपाडा येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी साकेत पोलिस परेड ग्राऊंड, मुख्यालय येथील जुने परेड ग्राऊंड, साकेत येथील हेली पॅड, सिद्धी हॉल व रहेजा गार्डन ठाणे स्पोर्ट क्लब येथे स्पर्धेचे साखळी सामने २२ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत.
झालेले साखळी सामने
आजतागायत हॉकी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), खो-खो (महिला व पुरुष), कबड्डी (महिला व पुरुष), रेसलिंग (महिला व पुरूष), बॉक्सिंग (महिला व पुरुष), तायक्वांदो (महिला व पुरुष), पॉवर लिफ्टिंग (महिला व पुरुष), व्हॉलीबॉल (महिला व पुरुष) असे साखळी सामने झाले आहेत. या खेळांचे अंतिम सामने होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त उर्वरित खेळ २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.