अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथ अग्निशमन दलात लवकरच सात नवीन वाहनांची भर पडणार आहे. या सात वाहनांसाठी तब्बल ११ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन फायर वॉटर टेंडर वाहने, दोन मल्टी पर्पस फायर टेंडर वाहने, एक वॉटर ब्राऊजर, दोन क्विक रिस्पोन्स वाहने अशी सात वाहने पालिका खरेदी करणार आहेत.
अंबरनाथ शहरात मोठेमोठी गृहसंकुले निर्माण होत आहेत. एमआयडीसी परिसरात आणि शहरात एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल सक्षम असावे, या हेतूने पालिका अनेक दिवसांपासून तयारी करत होती. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात पालिकेचे दोन स्वतंत्र अग्निशमन केंद्रे असून, काही महिन्यांपूर्वीच नव्या २७ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. दरम्यान, नव्याने कर्मचारी दाखल झाले असले, तरी पालिकेकडे मात्र जुनीच दोन अग्निशमन वाहने उपलब्ध होती. वाढते शहरीकरण पाहता अंबरनाथ नगरपालिकाचे अग्निशमन दल ही तितकेच सक्षम असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नव्या सात वाहनांसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. या निविदा प्रक्रियेत एकूण सात वाहनांची तरतूद करण्यात आली आहे. दोन फायर वॉटर टेंडर वाहने, दोन मल्टीपर्पस फायर टेंडर वाहने, एक वॉटर ब्राऊजर, दोन क्विक रिस्पोन्स वाहने अशी सात वाहने पालिका खरेदी करणार आहे. यासाठी तब्बल ११ कोटी ६४ लाखांचा खर्च येणार आहे. तसा निधीही मंजूर झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनेने यांनी दिली. सध्या अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेची संयुक्त उंच शिडीचे वाहन असून, ते दोन्ही शहरांत कार्यरत आहे.
प्रस्तावाला मंजुरी
अनेकदा एकाच वेळी आगीच्या किंवा आपात्कालीन घटना शहरात घडल्यास त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहनांची संख्या कमी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने त्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नवीन फायर फायटिंग आणि इतर वाहने खरेदीसाठी सादर केलेल्या ११ कोटी ६४ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या वाहनांमुळे अग्निशमन दल अधिक सक्षम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.