मुंबई

वन कर्मचारी ‘ऑन फायर’

CD

किन्हवली, ता. २५ (बातमीदार) : शहापूर-डोळखांब रस्त्यावरील वन हद्दीलगत भरदुपारी खासगी वनक्षेत्रात सोमवारी (ता. २४) वणवा लागला होता. या वणव्यामुळे वन संपत्तीचा ऱ्हास होऊ नये, म्हणून वन विभागाची फायर टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. यात मोठे वनक्षेत्र वाचवण्यात यश आले आहे.
शहापूर वन विभागातील धसई परिक्षेत्रअंतर्गत आंबेखोर परिमंडळ आणि डोळखांब परिक्षेत्रअंतर्गत गुंडा परिमंडळ या भागातील वनहद्दीलगतच्या खासगी मालकी क्षेत्रात शहापूर-डोळखांब रस्त्याच्या कडेला सोमवारी साडेबारा वाजता वणवा लागल्याची घटना घडली होती. वणव्याने हळूहळू रौद्र रूप धारण केल्याचे लक्षात येताच शेणवे व आंबेखोर परिमंडळातील वनमजूर आंबेखोर, कवटेवाडी, साखरवाडी येथील ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन धसई कार्यालयातील फायर टीमच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात आले. दुपारी २ वाजता ४० अंश तापमानातही कडक उन्हात भूक तहान विसरून सलग चार तास अथक परिश्रम घेत विस्तीर्ण गवताळ भागातील आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी आंबेखोर व गुंडा परिमंडळाचे वनक्षेत्र वाचवण्यात यश आले. धसई वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा परिमंडळाचे वनपाल, वनरक्षक, वनमजूर व फायर टीमच्या विजय महादू मुकणे आणि किशोर विठ्ठल वाघ या ‘फायर वॉचरने’ मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेतली. वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे राखीव वनक्षेत्र सुरक्षित राहिल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वणवा लागलेल्या भागात दुर्मिळ गोल्डन जॅकल (सोनेरी कोल्हा) याचे दर्शन झाले. वनविभागाच्या त्वरित कारवाईमुळे अशा अनेक वन्यजीवांचा अधिवास वाचला. वनक्षेत्रही सुरक्षित राहिल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. असे वणवे लागून वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.
- दर्शन ठाकूर, वन परिक्षेत्राधिकारी, धसई-शहापूर वनविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT