कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने रविवारी (ता. २३) ‘अमृत प्रोजेक्ट’अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले. त्या पार्श्वभूमीवर अमृत जलस्रोतांचे स्वच्छता अभियान ठाणे व डोंबिवली क्षेत्रात राबवण्यात आले.
सिद्धेश्वर तलाव, हंसनगर, ठाणे (पश्चिम); रायलादेवी तलाव, वागळे इस्टेट, ठाणे, ओवळा निरंकारी भवनजवळील तलाव; तसेच डोंबिवली परिक्षेत्रामध्ये गावदेवी मंदिर सार्वजनिक तलाव, डोंबिवली; गणेश तलाव, डोंबिवली (पूर्व); गणपती विसर्जन तलाव, ठाकुर्ली (पूर्व); गौरीपाडा तलाव, कल्याण (पश्चिम); नांदिवली कोळीवाडा तलाव, कल्याण (पूर्व); आडीवली ढोकाळी तलाव, कल्याण (पूर्व); उल्हास नदी, पांजरापोळ, भिसोल; माऊली तलाव, निळजे गांव; उल्हास नदी, बदलापूर (पश्चिम); टेमघर व देवजीनगर येथील तलाव, भिवंडी; खदान तलाव, अंबरनाथ (पश्चिम); बुरदुल गाव तलाव; गणेश विसर्जन घाट व भातसा नदी, वासिंद; गंगा देवस्थान, शहापूर आणि व्यंकटेश्वर मंदिर उल्हास नदी, आंबिवली (पूर्व) आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या व्यतिरिक्त मुंबई शहर व उपनगरातील कित्येक तलाव व समुद्रतटीय किनारा, नवी मुंबईतील अनेक तलाव व मिनी सी शोर; उरणचे तलाव व समुद्र किनारे, भाईंदरची उत्तन चौपाटी; वालीव (वसई) येथील तलाव, नालासोपारा येथील कळंब समुद्रकिनारा आणि विरार येथील अर्नाळा बीच येथे व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी वाढवला भक्तगणांचा उत्साह
अभियानादरम्यान अनेक मान्यवर व्यक्तींनी जागोजागी सदिच्छा भेट दिली. स्वच्छता अभियानाचे अवलोकन करण्याबरोबरच मिशनच्या मानवतेच्या प्रति केल्या जाणाऱ्या कार्यांची प्रशंसा केली. या वेळी राज्याचे पर्यटन व कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गिरगाव चौपाटी येथे, राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे, आमदार संजय केळकर व आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे येथील सिद्धेश्वर तलाव येथे, तर बदलापूर येथे आमदार किसन कथोरे आदींनी उपस्थित राहून सेवादार भक्तगणांचा उत्साह वाढवला. या व्यतिरिक्त अनेक समाजसेवी सज्जन व महापालिका अधिकाऱ्यांनीही या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.