भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत सेवा बजावून निवृत्त झालेल्या १४ सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून हक्काची कायमस्वरूपी घरे मिळणार आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच कर्मचाऱ्यांच्या नावाला मान्यता दिली आहे.
डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य योजनेंतर्गत ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून जास्त झाली असेल, त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी पक्के घर देणे बंधनकारक आहे. त्यानुसार याआधी महापालिकेतील ८४ सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळाली आहेत; मात्र उर्वरित सफाई कर्मचाऱ्यांना देण्यासाठी महापालिकेकडे स्वत:ची घरे नसल्याने सुमारे २१० सफाई कर्मचारी घरापासून वंचित आहेत. काशी मिरा भागात परवडणारी घरे योजनेतून उभ्या राहिलेल्या एका गृहसंकुलातील ५१ घरे महापालिकेला अलीकडेच प्राप्त झाली आहेत. त्यातील काही घरे सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा लाभ देण्याआधी त्यांच्या नावाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार महापालिकेने त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यातील १४ नावांना मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनुसार संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना घरांचा ताबा देण्याची कारवाई महापालिका प्रशासनाकडून लवकरच केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.