मुंबई

उन्हाळ्यात मुंबईसाठी १,६०० मेगावॉट विजेची सोय

CD

उन्हाळ्यात मुंबईसाठी १,६०० मेगावॉट विजेची सोय
टाटा पॉवर विविध प्रकल्पांतून घेणार वीज; ग्राहकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यातील तापमानाचा पारा वाढू लागल्याने विजेच्या मागणीतही वाढ नोंदली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पाॅवरने मुंबईतील आपल्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी म्हणून कंबर कसली आहे. त्यानुसार जवळपास १,६०० मेगावाॅटपर्यंत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात जवळपास ४५ लाखांहून अधिक वीज ग्राहक असून गेल्या वर्षी उन्हाळ्यात त्यांची तब्बल ४,३०७ मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली होती. यंदा ती ४,५०० मेगावाॅटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. टाटा पाॅवरचे उपनगरात जवळपास आठ लाख वीज ग्राहक असून त्यांची गेल्या उन्हाळ्यात १,०६३ मेगावाॅट एवढी विजेची मागणी वाढली होती; ती यंदा १,१०० मेगावाॅटपर्यंत जाणे अपेक्षित आहे. तरीही आणीबाणीच्या वेळी विजेचा तुटवडा भासू नये म्हणून औष्णिक, जलविद्युत, सौर, पवन अशा वेगवगेळ्या वीज प्रकल्पांतून तब्बल १,६०० मेगावाॅट विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त २०० मेगावाॅट विजेच्या खरेदीसाठी करार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे टाटा पाॅवरने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईतील टाटा पाॅवरच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.

थर्मल स्कॅनिंगद्वारे मॉनिटरिंग
विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर टाटा पाॅवरकडून विशेष तयारी केली जात आहे. त्यानुसार सर्व ट्रान्स्फॉर्मर, फीडर पिलर्स आणि केबल्सचे थर्मल स्कॅनिंगद्वारे देखरेख करण्यात येत आहे. तसेच सामान्य ऑपरेटिंग पॉइंट्स बदलून लोड ऑप्टिमायझेशन करण्यात येत आहे. सुरक्षितता आणि ऑटोमेशन उपायांमध्ये सुरक्षित कामाच्या ठिकाणी ‘एआय’च्या आधारे सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण आदींचा समावेश आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा सहज शोध घेणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT