मुंबई

पक्षबांधणीसाठी ठाकरे गटाचे नेते ठाण्यात

CD

पक्षबांधणीसाठी ठाकरे गटाचे नेते ठाण्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २५ : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील फूट राेखण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आता थेट ठाण्यातच २ मार्चला ठाकरे गटाचे नेते दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे ९ मार्च रोजी मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांचे शिबिर घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाचे नेते, उपनेते, विभागप्रमुख यांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्री तसेच शिवसेना भवन येथे घेण्यात येत आहेत. आगामी निवडणुकांची तयारी तसेच राज्यभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शिवसेनेकडून (ठाकरे) रणनीती आखली जात आहे. नेत्यांना राज्यभर दौरा घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातूनच २ मार्चपासून या दौऱ्यांना सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आमदार सुनील राऊत यांनी ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांचे शिबिर मुलुंड येथे आयोजित केले आहे. ९ मार्च रोजी मुलुंड येथे होणाऱ्या या शिबिराला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT