मुंबई

‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी झुंबड

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : आता सर्वच वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ लावणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल १३ हजार वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहे. त्यापैकी दोन हजार १६९ वाहनधारकांनी वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवली आहे. येत्या ३० एप्रिलपूर्वी वाहनधारकांनी आपल्या वाहनांना हे सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावे, असे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे आहे. अशा विविध कारणांमुळे नंबर प्लेट रून वाहनाची खरी ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ ला आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ असणे सक्तीचे केले आहे. १ एप्रिल २०१९नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे. मात्र, त्यापूर्वीच्या वाहनांवर नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाइन बुकिंगवर क्लिक केल्यास आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २४ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १३ हजार जुन्या वाहनांनी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’साठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यापैकी दोन हजार १६९ नंबर प्लेट बसवल्या आहेत. तर चार हजार ४२० वाहनांना अपॉइंटमेंट दिली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली, तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही. यामुळे ३० एप्रिलनंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
- रोहित काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT