मुंबई

कोपरीतील रहिवाशांची विकसकाकडून फसवणूक?

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे पूर्व भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यानुसार कोपरीतील सिंधी कॉलनीतील १६ नंबर इमारतधारकांना आधी ४५० चौरस फुटांचे घर विकसकाने मंजूर केले. मात्र, आता ते देणे शक्य नसल्याचे विकसकाने स्पष्ट केले. विकसकाने महापालिका अधिकाऱ्यांना आणि इमारतीमधील काहींना हाताशी धरून इमारतच अतिधोकादायक घोषित करून रहिवाशांना बेघर करण्याचा घाट घातल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या रहिवाशांना योग्य न्याय मिळेपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा सुरू ठेवेल, असा इशारा दिला आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राहुल पिंगळे यांच्यासह कोपरीतील फसवणूक झालेले रहिवासीही उपस्थित होते.
विकसकाबरोबर २०१६मध्ये करार झाला होता. त्यानुसार ४५० चौरस फुटांचे घर देण्याचे त्याने मान्य केले होते. येथील ३६ रहिवाशांबरोबर हा करार करण्यात आला होता. परंतु, २०२२मध्ये त्याने ४०० चौरस फुटांचेच घर देऊ शकतो, असे रहिवाशांना सांगितले. त्याला आम्ही विरोध केला. त्यातही सोसायटी रजिस्टर नाही, कन्व्हेन्स नसल्याने विकसकाने वैयक्तिक करार केले होते. असे असताना काही रहिवाशांनी विरोध केल्याने विकसकाने आता मी इमारतच बांधणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर येथील अर्ध्याहून अधिक रहिवाशांनी याला विरोध केला. विकसकाने काही रहिवाशांना हाताशी धरून पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करत इमारतीला अतिधोकादायकमध्ये नोंद करून घेतली. आता पालिकेने कारवाईही प्रस्तावित केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करत असून, येथील रहिवाशांना न्याय मिळावा, हक्काचे घर मिळावे, असे मत चव्हाण यांनी स्पष्ट केले. विकसकाच्या या धोरणाविरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते. मात्र, पालिकेने इमारत अतिधोकादायक असल्याचे पुरावे सादर केल्याने याचिका हारली. आता रहिवाशांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT