मुंबई

चित्रनगरी परिसरातील आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत बैठक

CD

चित्रनगरी परिसरातील आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत बैठक
चर्चा करून निर्णय घेण्याची खासदार रवींद्र वायकरांची मागणी
जोगेश्वरी, ता. २६ ः चित्रनगरीच्या जागेतील आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करावी. सर्व मूलभूत सोयीसुविधा देऊन उपजीविकेच्या साधानासहित त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत सोमवारी (ता. २४) पार पडलेल्या बैठकीत केली.
चित्रनगरीच्या अखत्यारीत असलेल्या जागेमध्ये नुकतीच आग लागली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार वायकर यांनी चित्रनगरीत बैठक घेतली. या बैठकीला व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावलकर, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपूरकर, नायब तहसीलदार किरण आम्बुर्ली, भूमापक आर. जे. ठाकूर, पी. दक्षिण मनपा विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अग्निशमन दलाचे अधिकारी सोमनाथ जायभाय, वनपाल आर. पी. पाटोळे, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, शाखाप्रमुख बाळकृष्ण जोशी, राजन राणे, पूजा शिंदे, सुरेखा गुटे, हिनल पंड्या, रेणू यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी चित्रनगरी स्वतःची अग्निशमन यंत्रणा उभारणार असून, एका फायर अधिकाऱ्याची नेमणूकही करणार असल्याची माहिती म्हसे पाटील यांनी या वेळी दिली. चित्रनगरीने स्‍वतःच्या जागेचे सर्वेक्षण करून जागेसभोवताली कुंपण घालण्याची सूचना खासदार वायकर यांनी केली. चित्रनगरीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने त्याचा विकास करण्यात येणार आहे. आझादी का अमृत फंडच्या माध्यमातून सध्या चित्रनगरीतील स्टुडिओचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती म्हसे पाटील यांनी दिली.
चित्रानगरीतील अनधिकृत गोदामे काढून टाकण्यात यावीत, शाळेच्या बसेस चित्रनगरीतून जाण्याची मुभा द्यावी, वनराई पोलिस ठाणे येथील रस्ता खुला करावा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही खासदार वायकर यांनी व्यवस्थापकीय संचालकांना केल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT