मुंबई

बेकायदा शाळांमध्ये १९ हजार विद्यार्थी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : महापलिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटल्याचे दिसून येत आहे. पालिका क्षेत्रात ८१ अनधिकृत शाळा असून, त्यात १९ हजार ७०८ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची बाब समोर आली आहे. या सर्व ८१ शाळांविरोधात ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ६८ शाळांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच उर्वरित १३ अनधिकृत शाळांविरोधात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. दुसरीकडे ८१ अनधिकृत शाळांमध्ये सर्वाधिक ६५ शाळा दिव्यात असल्याची बाब पुढे आल्याने अनधिकृत बांधकामांपाठोपाठ आता अनधिकृत शाळांचे शहर म्हणून दिवा पुन्हा चर्चेत आले आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. या शाळांची नोंदणी नाही, काही शाळा बेकायदा इमारतीत आहेत, काही शाळा निवासी इमारतीत, भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. या सर्व अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना ५२ कोटींचा दंड करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले. अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत.

कागदपत्रे पूर्ण करण्याचा प्रस्ताव
ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे. ८१ पैकी पाच शाळांनी त्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित ७६ शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांना आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

नळजोडणी खंडित
दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे. आतापर्यंत ३२ अनधिकृत शाळांची नळजोडणी खंडित केली आहे. या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित आहे.

विद्यार्थ्यांचे समायोजन होणार
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना नजीकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार केला जात आहे. त्यास १९ खासगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले.

पालिका परिसरातील शाळांचा लेखाजोखा
प्रभाग बेकायदा शाळा विद्यार्थी संख्या
दिवा ६५ १६,४३७
मुंब्रा ८ १,८२६
माजिवडा-मानपाडा ३ ५६२
कळवा ३ ४१५
उथळसर २ ४६८
एकूण ८१ १९,७०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT