मुंबई

वृक्ष प्राधिकरणाचा हरित नवी मुंबईचा ध्यास

CD

हरित शहराकडे नवी मुंबईची वाटचाल
अर्थसंकल्पात ७३ कोटी ९३ लाखांची तरतूद; ४५ हजार वृक्ष लावण्याचा निर्धार

वाशी, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबईला स्वच्छ, हरित व प्लास्टिकमुक्त शहर बनवण्यासाठी महापालिकेने वाटचाल सुरू केली आहे. यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवनवीन संकल्पना अमलात आणल्या आहेत. वृक्ष प्राधिकरणाचा अहवाल सादर करताना यंदा जवळपास ७३ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तसेच वर्षभरात शहरात ४५ हजार वृक्ष लावण्याचा निर्धारदेखील करण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत २१६ प्रजातींतील १५ लाख २८ हजार ७७९ वृक्षांची नोंदणी आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून वृक्ष उपकारापोटी जमा होणारी रक्कम वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत पर्यावरणातील विविध उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
शहराच्या विकासाकडे लक्ष देताना उद्यानातील पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती करणे तसेच हवा प्रदूषण कमी करण्यासाठी ४२ लाख ८०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्‍याची माहिती आयुक्‍तांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्‍त्राची माहिती व्हावी, त्याचा अभ्यासक्रमात उपयोग व्हावा, तर पर्यटकांना शहराचे आकर्षण वाढवण्यासाठी कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल उद्यान तयार करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. यासाठी अंदाजपत्रकामध्ये आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

भाजीपाला, फळे, फुले प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी खासगी व सार्वजनिक संस्थांना स्थान देण्यात आले असून, उद्यानविद्या प्रदर्शन आणि वृक्षमित्र पुरस्कार याकरिता एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ता दुभाजकामध्ये लागवड करण्यात आलेल्या शोभिवंत झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४७२.५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेत सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींची तसेच वृक्ष फांद्या छाटणीकरिता १ कोटी ७५ लाख, ज्‍या मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण केले आहे त्या ठिकाणी कुंपण घालण्यासाठी १ कोटी ९५ लाखांची तरतूद केली आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणची परिस्थिती पाहता नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी ही स्थिरांकित आहे. भविष्यात पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी नागरिकांकडून सहकार्य मिळेल,अशी अपेक्षा आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका


४५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वर्षभरात नवी मुंबई शहरातील तुर्भे डम्‍पिंग ग्राउंड, ठाणे-बेलापूर रोड, घणसोली-दिघासह विविध विभागांमध्ये ४५ हजार वृक्ष रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

चौकट

सीएसआर निधीचाही वापर

हरित नवी मुंबई बनविण्यासाठी सीएसआर निधीचाही वापर केला जाणार आहे. यापूर्वी सीएसआर निधीतून ६१ हजार वृक्ष लावण्यात आले आहेत. २३ ठिकाणी ३० हजार ३७१ चौरस मीटर क्षेत्रातील रस्ते, दुभाजक व चौक सुशोभीकरणाचे कामही सीएसआर निधीतून करण्यात येत आहे.

चौकट
उद्यानांसाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर
नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जात असून, पालिकेकडून सद्य:स्थितीमध्ये काही उद्यानांना प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करण्यात येत आहे. यापुढील काळामध्ये आणखी उद्यानांमधील झाडाझुडपांसाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी पालिका आयुक्तांनादेखील पुढाकार घेतला आहे.

चौकट

ठिबक सिंचन
दुभाजकांमधील हिरवळीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाणार आहे. शहरात रोपवाटिका तयार केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या बाजूला मोकळे भूखंड व दुभाजकांमध्ये हिरवळ विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT