मुंबई

गॅस गळतीमुळे भीषण आग

CD

गॅस गळतीमुळे भीषण आग
तळोजा येथील शिर्के कामगार वसाहतीमधील घटना
खारघर, ता. २६ (बातमीदार) : तळोजा येथील बी.जी. शिर्के कामगार वसाहतीमध्ये सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २६) घडली. या आगीत येथील कामगारांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कळंबोली येथील अग्निशमन जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

तळोजा फेज दोनमध्ये सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम शिर्के कन्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या निवासासाठी लोखंडी पत्र्यांची घरे उभारण्यात आली आहेत. या वसाहतीला बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. येथील सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे लागलेल्या या आगीत पंधराहून अधिक घरे जळून खाक झाली. या आगीत कामगारांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. यामध्ये कामगारांचे बहुतांश जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाहून तीन सिलिंडर बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कळंबोली अग्निशमन केंद्राचे अधिकारी फतेसिंग गायकवाड यांनी या वेळी सांगितले, की ‘या स्फोटात सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे ही आगीची घटना घडल्याचे दिसून येते. या आगीत कामगारांच्या मालमत्तेचे नुकसान झाले; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.’ दरम्यान, वर्षभरापूर्वी कामगारांच्या या चाळीत सिलिंडर स्फोट होऊन दहा घरांचे नुकसान झाले होते. त्या स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT