मुंबई

पालिका उभारणार सीएसआर फंडातून निधी

CD

पालिका उभारणार सीएसआर फंडातून निधी
औद्यागिक पट्ट्यातील कारखानदारांची घेणार मदत
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या कारखानदारांकडून तसेच दानशूर व्यक्तींमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) जमा करणार आहे. तर हा निधी पालिका शहरातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण यासाठी खर्च करणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर एक विशेष कंपनी स्थापन करण्याचा मानसदेखील व्यक्त केला आहे.
नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी येत्या आर्थिक वर्षाचा पाच हजार ७०९ कोटी रुपयांच्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. पालिकेच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये १,३०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्याज पालिकेस दरवर्षी मिळते. यामध्ये पुढील वर्षातदेखील यात वाढ होणार आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील मोठ्या कंपन्या तसेच दानशूर व्यक्तींकडून सामाजिक माध्यमातून दिला जाणारा निधी कसा गोळा करता येईल याची चाचपणी आता पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेकडून कंपनी कायद्याखाली कलम आठनुसार ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत असणाऱ्या कंपन्यांकडून सीएसआर निधी देण्यासाठी तयार असतात. मात्र असा निधी घेणे व त्याचा वापर करणे याबाबत महापालिकेकडे कार्यपद्धती नसल्यामुळे कंपन्यांकडून पालिकेला असा निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे पालिकेचेदेखील नुकसान होते. यासाठी पालिकेकडून एक विशेष कंपनी स्थापन करून हा निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणाार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.
....................
निधीचा उपयोग सामाजिक उपक्रमांवर
कंपन्या तसेच नागरिकांकडून सीएसआरच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी महापालिकेने नवी कंपनी स्थापन करण्याचे संकेत या अर्थसंकल्पात दिले आहेत. ही कंपनी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कार्यरत राहील, अशी माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. सीएसआरमार्फत उभा केला जाणारा निधी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण तसेच अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांवरच खर्च केला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT