मुंबई

शिवभक्तांनी कचऱ्यातूनच घेतले शिवदर्शन!

CD

शिवभक्तांनी कचऱ्यातूनच घेतले शिवदर्शन!
अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये ऐन महाशिवरात्रीच्या दिवशीही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले होते. भाविकांनी याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्रवास करत मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नगरपालिकेच्या वतीने समीक्षा कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, सात महिन्यांपासून ठेकेदाराचे बिल थकल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकले. तसेच पीएफ, फंड, आरोग्य सुविधा या मागण्या घेऊन पालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. दरम्यान, त्यांच्या या संपाचा आजचा पाचवा दिवस उलटल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य न झाल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एकीकडे देशभरात महाशिवरात्रीचा जल्लोष सुरू असताना अंबरनाथमध्ये मात्र भाविक कचऱ्यातून ये-जा करताना दिसत आहेत. अंबरनाथमधील प्राचीनकालीन हे शिवमंदिर आहे. भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत मंदिर म्हणून याची ख्याती आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येथे पहाटेपासून रांगा लावतात. याच कचऱ्यातून त्यांना दर्शनासाठी जावे लागले. दरम्यान, ठेकेदाराने थकीत पगार दिल्यानंतर ही कर्मचाऱ्यांनी आपल्या इतर मागण्यांसाठी संप कायम ठेवल्याने अंबरनाथमध्ये यंदा भाविक कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून चालत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT