मुंबई

एसी लोकलमध्ये फुकट्यांचा सुळसुळाट

CD

एसी लोकलमध्ये फुकट्यांचा सुळसुळाट
५१ हजारांवर कारवाई; १.७२ कोटींची दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईतील वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, पश्चिम रेल्वेने या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या दहा महिन्यांत तब्बल ५१,६०० हून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करीत १.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाढत्या विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागात दररोज १.२६ लाखांहून अधिक प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात. अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ५१,६००हून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल १.७२ कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आला. जानेवारी २०२५ मध्ये सहा हजार २५८ प्रवासी विनातिकीट सापडले. त्यांच्याकडून २०.९७ लाख रुपये दंड आकारण्यात आला. तुलनेत जानेवारी २०२४ मध्ये ४,७४३ प्रकरणांमध्ये १६.०७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. याचा अर्थ एकूण कारवाईत ३२ टक्के वाढ, तर दंडाच्या रकमेवर ३१ टक्के वाढ झाली आहे. याबाबत अधिक माहिती देताना विनीत अभिषेक म्हणाले, की प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक करण्यासाठी मुंबई विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ‘एसी टास्क फोर्स’ नेमण्यात आला आहे. याशिवाय वेळोवेळी विशेष तपासणी मोहिमा हाती घेतल्या जातात.
...
तक्रारीसाठी हेल्पलाइन
एसी लोकल प्रवासादरम्यान कोणत्याही गैरप्रकाराची तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १३९ किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९००४४९७३६४ वर संपर्क साधता येईल. या तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाते. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे, की अनधिकृत प्रवास टाळावा आणि अधिकृत तिकीट खरेदी करून नियमांचे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT