मुंबई

थाोडक्‍यात बातम्या रायगड

CD

थाोडक्‍यात बातम्या रायगड
माणगावमध्ये आढळल्या तीन बेवारस मोटारसायकली
माणगाव (बातमीदार) ः माणगाव पोलिस ठाणेअंतर्गत तीन बेवारस मोटारसायकली आढळून आल्या आहेत. माणगाव पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. माणगाव पोलिस ठाणे हद्दीमध्ये तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत आढळून आल्या आहेत. त्‍यामुळे ज्‍या नागरिकांच्या मोटारसायकली किंवा इतर वाहने चोरीस गेली असल्यास माणगाव पोलिस ठाण्यात येऊन खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा सदरील बेवारस वाहनांची रितसर शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल. लिलावानंतर कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे माणगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये काळ्या रंगाची जुनी प्लसर १५० सीसी नंबर नसलेली, चेसीस व इंजीन नंबर स्पष्ट दिसत नाही. दुसरी काळ्या रंगाची जुनी प्लसर १५०, तर तिसरी प्लॅटीना बजाज हिरव्या रंगाची एम. एच. ०२ एफ. ओ. ३७२४ असा तिचा क्रमांक आहे.
............
सांगडे येथे किसान कार्डबाबत शिबिर
रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या सांगडे येथे विविध शासकीय योजनांची माहिती व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरीवर्गाला आवश्यक ठरणारे किसान कार्डबाबतचे शिबिर नुकतेच पार पडले. या वेळी येथील तलाठी अक्षया मोहिते यांनी किसान शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहज कृषी कर्जाच्या सुलभतेबाबत, बाजार भाव यासाठी या कार्डची वेळोवेळी लागणारी गरज व त्याचे शेतकरीवर्गाला होत असलेले फायदे याबाबत माहिती सांगितली. प्रत्येक शेतकऱ्याने हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन त्‍यांनी केले. याप्रसंगी पल्लवी उबाळे, संतोष कराळे, अर्चना पवार, अशोक मोहिते, केशव खरिवले यांनी या शिबिराचे यशस्वीतेसाठी व सहकार्य करून शेतकरीवर्गाला आवश्यक ती माहिती दिली, तर या शिबिरात सुमारे शेकडो शेतकरीवर्गाने आपला सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला.
...............
वढाचे हभप रामचंद्र म्हात्रे यांचे निधन
पेण बातमीदार ः वढाव येथील हभप रामचंद्र काशिनाथ म्हात्रे यांचे नुकतेच निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. राधाकृष्ण मंदिराचे पुजारी तसेच स्वातंत्र्य सैनिक विष्णू नारायण परांजपे यांचे शिष्य होते. रामचंद्र म्हात्रे यांनी वढाव या ठिकाणी ६० वर्षे भजन सेवा केली. ते राधाकृष्ण मंदिराचे ट्रस्टी होते. तसेच वाशीचे सागर विद्यालयाचे अध्यक्ष होते. त्‍यांच्या पश्चात दोन मुलगे, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
..................
बांधण येथील कबड्डी स्पर्धेत धेरंड संघ अंतिम विजेता
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील बांधण (तलाव) येथे झालेल्या पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड संघ अंतिम विजेता ठरला आहे. बांधण येथील प्रतिज्ञा क्रीडा मंडळाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने शनिवार १ मार्च रोजी कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात मरीदेवी धेरंड संघ अंतिम विजेता ठरला आहे. या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. त्यात प्रथम क्रमांक मरीदेवी धेरंड, द्वितीय क्रमांक जय हनुमान उचेडे, तृतीय क्रमांक श्रीराम गडब, तर चतुर्थ क्रमांक मातृछाया कुर्डुस या संघाने मिळवला. या सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ऋषिकेश पाटील (धेरंड), उत्कृष्ट चढाई जयेश गावंड (उचेडे), पब्लिक हिरो अनुज कोठेकर (गडब) या खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे उद्‌घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
...............
अलिबाग वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
अलिबाग वार्ताहर ः कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन अलिबागच्या सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड आणि सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैला पाटील, तर व्यासपीठावर वर्षा कुवळेकर, अनंत देवघरकर, विलास नाईक आणि ग्रंथ मित्र नागेश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी लेखक विलास नाईक यांनी परिस्थितीअभावी आपले साहित्य छापू न शकणाऱ्या साहित्यिकांना शासनाने मदतीचा हात द्यावा, असे प्रतिपादन केले. वर्षा कुवळेकर यांनी ग्रंथालयातील वाचनामुळे लेखक म्हणून घडण्यास मदत होत असल्याचे सांगितले आणि दर्जेदार साहित्याचे संकलन करण्याची गरज व्यक्त केली. शैला पाटील यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या घरापासूनच सुरू करावी, असे मत मांडले. श्रुती राजे देसाई यांनी मराठीचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढवण्याचे आवाहन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी अभिजात भाषा फक्त कागदावर न राहता ती जीवनात रुजली पाहिजे, असे सांगत मराठी वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रत्येक घरात पोहोचावीत, यावर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बोन्द्रे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अजित पवार यांनी मानले. यावेळी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, हर्षद कशाळकर, वर्षा दिवेकर, संध्या कुळकर्णी, भालचंद्र वर्तक, ॲड. राजेंद्र जैन, आर. के. घरत, नंदु तळकर, रजिता माळवी, हेमकांत सोनार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
..................
रसायनी पोलिसांकडून चोरीतील दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
खालापूर (बातमीदार) ः रसायनी पोलिस ठाणे हद्दीतील कारखान्यातून चोरीला गेलेला दोन लाख १२ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्‍तगत केला आहे, तर याप्रकरणी आकाश ओव्हाळ (वय २७, रा. कोपरखैरणे नवी मुंबई), आणि मोहम्मद सद्दाम हुसेन नजीर खान (वय ४१, रा. तुर्भे, ठाणे) आदी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एक्वाप्युरो इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात २३ फेब्रुवारी रोजी चोरीची घटना घडली होती. यावेळी चोरट्यांनी दोन लाख १२ हजार रुपये किमतीची आठ आणि चार इंचाची स्टीलची पाइप, फ्लायजेस, एल्बो यांच्यापासून बनवलेले वॉटर फिल्टर करता लागणारे भाग चोरून नेले होते. कारखाना व्यवस्थापकाने चोरीची तक्रार रसायनी पोलिस ठाण्यात दिली होती. रसायनी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलिस हवालदार मंगेश लांगी, पोलिस शिपाई राजेश वळवी असे पथक तयार करून तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयित टेम्पो ताब्यात घेतला. चौकशीत ओव्हाळ आणि खान यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस पथकाने केलेल्या वेगवान तपासाचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले आहे.
.....................
सैन्य दलातून जवान नीलेश पाटील सेवानिवृत्त
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील चिखली येथील रहिवासी जवान नीलेश पाटील हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त ग्रामस्थ मंडळ चिखली यांच्या वतीने सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नीलेश पाटील यांनी नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन जम्मू (पूंछ) सिकंदराबाद, श्रीनगर, पंजाब, गुंजी, बरेली अशा विविध ठिकाणी २२ वर्षे सेवा बजावून १०१ फिल्ड रेजिमेंट (तोफखाना)मधून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पेझारी ते चिखली अशी त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच पोयनाड परिसरातील माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते.
...............
ऐतिहासिक निबंध स्‍पर्धेत देविदास म्हात्रे यांचे सुयश
पेण (बातमीदार)ः वढाव तालुका पेण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास गणपत म्हात्रे यांना नेताजी पालकर मंडळ, चौक येथील उंबरखिंड विजय दिन यानिमित्ताने शिवशाहीतील ऐतिहासिक स्थळ आणि परिसरातील महल या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. ही ऐतिहासिक निबंध स्पर्धा रायगड भूषण यशवंत सकपाळ, चौक व भूषण पिंगळे, कर्जत यांनी आयोजित केली होती. गेली ५६ वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT