पामबीच गॅलेरिया मॉलमधील हुक्का पार्लरवर छापा
चालक-मालक, मॅनेजरसह वेटर अशा एकूण २१ जणांवर कारवाई
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नुकतीच पामबीच गॅलेरिया मॉलमधील डिव्हाईन लाऊंज बार अँड रूफ टॉपमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा मारून मालक-चालक, मॅनेजर व वेटर अशा एकूण २१ जणांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर जप्त केले आहेत. बेकायदा चालवण्यात येणाऱ्या या हुक्का पार्लरवर गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कारवाई करण्यात आली होती; मात्र त्यानंतरदेखील पुन्हा हे हुक्का पार्लर बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे या कारवाईनंतर दिसून येत आहे.
एपीएमसीतील पामबीच गॅलेरिया मॉलमधील पाचव्या मजल्यावर सुरू असलेल्या डिव्हाईन लाऊंज बार अँड रूफ टॉपमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधिकारी पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने पावणेबारा वाजण्याच्या सुमारास डिव्हाईन लाऊंज बार अँड रूफ टॉपवर छापा मारला. त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटचे मालक सरलाबेन सावला, चालक फैजल सिद्धीकी, सुनील भानुशाली, संतोष पाटील, थावरु भिमा, चव्हाण ऊर्फ गब्बर, मॅनेजर रहमान हुसेन रिजवान हुसेनरिजवी तसेच वेटर व त्यांना या कामात मदत करणारे अशा एकूण २१ जणांविरोधात कोफ्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
................
निकोटीन जनजागृतीपर फलकाचा अभाव
या वेळी बारमध्ये काही व्यक्ती हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. तसेच त्याठिकाणी कोणतेही निकोटीनबाबत जनजागृतीपर फलक न लावता तसेच नो स्मोकिंग झोनबाबत काहीएक उपाययोजना न करता ग्राहकांना हुक्का पुरविण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.