मुंबई

नवी मुंबईच्‍या प्रवेशद्वारावर अनधिकृत होर्डिंगबाजी

CD

नवी मुंबईच्‍या प्रवेशद्वारावर अनधिकृत होर्डिंगबाजी
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबईच्‍या प्रवेशद्वारावर अनधिकृत होर्डिंगबाजी होत असल्याने स्‍थानिकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवरील पालिका क्षेत्रामध्ये हद्दीसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगच्या जागी आता राजकीय बॅनर्स लावण्यात आल्याने याप्रकरणी माजी स्‍थायी समिती सभापती नवीन गवते यांनी पालिका आयुक्‍तांकडे तक्रार केली आहे.
नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या दरम्यान असणाऱ्या हद्दीमध्ये पूर्वी ठाणे महापालिकेची कमान होती, मात्र काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने त्यांची असणारी कमान सुरक्षेच्या कारणास्तव जमीनदोस्त केली. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेने त्यांच्या हद्दीची सुरुवात दाखवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत डिजिटल फलक लावला होता, तर या फलकासमोरील बांबूच्या परांची असणारी राजकीय जाहिरात काढून टाकण्यात आली होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्यामुळे पालिकेचा असणारा डिजिटल फलक हा तुटून पडला. त्‍यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी राजकीय नेत्यांकडून अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली. त्‍यामुळे स्‍थानिकांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. या अनधिकृत होर्डिंगबाबत माजी स्‍थायी समिती सभापती नवीन गवते यांनी पालिका आयुक्‍तांकडे तक्रार केली आहे.
..........................
नवी मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर असणारा डिजिटल फलक वादळी वाऱ्यात पडला आहे. या ठिकाणी नवी मुंबईची प्रवेशद्वार असणारा हा फलक पालिकेकडून लावण्यात यावा, यासाठी पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.
-नवीन गवते, माजी स्थायी समिती सभापती, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT