टोकावडे, ता. ४ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील अनेक गावात खरिपाच्या हंगामातील भाजीपाला, कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे; परंतु शेतकऱ्यांची नजर चुकवून नीलगाई शेतात घुसून पिकांची नासाडी करीत असल्याने मुरबाडमधील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, उडीद, वाल, मोहरी, कोथिंबीर, तुरी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी लागवड केली आहे; मात्र पिकाने भरलेल्या या हिरव्यागार शेतात नीलगाईंचा वावर वाढला आहे. दिवसा तसेच रात्री शेतकऱ्यांची नजर चुकवून नीलगाई पिकांचा फडशा पाडत आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे संकटात सापडलेला शेतकरी खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी धडपडत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वन्यजीवांच्या उपद्रवामुळे अनेकांनी खरीप हंगामात लागवड करणे सोडून दिले आहे. तर वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अर्ज दाखल करावा. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती टोकावडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. भोसले यांनी दिली आहे.
--------------------------------
नीलगाईंमुळे रात्री अपघातांना निमंत्रण
नीलगाईंचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी तारेच्या कुंपणाभोवती पाच ते सात फूट उंचीपर्यंत हिरव्या रंगाची जाळी, जुन्या साड्या लावल्या होत्या. यामुळे काही प्रमाणात खरीप पिकांचे संरक्षण होत होते; परंतु नीलगाई कुंपणावरूनही शेतात येत असल्याने आता वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच, रात्री-अपरात्री दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांसाठी नीलगाई अपघाताचे निमित्त ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.