मुंबई

शिवकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

CD

नरेश जाधव ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ४ ः स्वच्छ भारत योजनेतून अनेक शहरे, गावे स्वच्छ होत असताना खर्डीगावातील शिवकालीन तलाव मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या तलावात पाण्यावर शेवाळे साचले असून, रहिवासी कचरा टाकत असल्याने शिवकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
खर्डीगाव परिसरातील कधीकाळी पर्यटनाचे केंद्र असलेल्या पाझर तलावाची बिकट अवस्था झाली आहे. तीन ते चार एकरच्या विस्तीर्ण जागेतील तलाव दरवर्षी पावसाळ्यात तलाव वाहतो, परंतु संरक्षण भिंत नसल्याने तसेच पाण्याचा कोणताही वापर केला जात नसल्याने जनावरे, घरातील घाण, खरकटे, निर्माल्य टाकण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे या परिसरालाच बकालपणा आला आहे. तलावातील पाण्यावर शेवाळ साचले आले असून, पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे गाळ काढून तलावाच्या सुशोभीकरणाची मागणी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, जून २०२४ मध्ये मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी खर्डी येथील शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण करण्याची मागणी ठाणे लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती.
--------------------------------- --------------–------------------
खर्डी गावाचे सौदर्य वाढवण्यासाठी तलावाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. तसेच दरवर्षी वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग गावासाठी केल्यास निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईतूनही दिलासा मिळेल.
- सगीर शेख, मनसे शहराध्यक्ष, खर्डी
----------------- - - - - ----------------------------------
खर्डी येथील तलावाच्या संदर्भात लघु पाट बंधारेच्या आदेशानुसार सुशोभीकरण करण्याच्या कामाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
- मौसीम शेख, उपसरपंच, खर्डी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT