धोकादायक झालेल्या पादचारी पुलाची होणार दुरुस्ती
सायन-पनवेल मार्गावरील वाहतुकीत बदल
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा येथील पादचारी पुलाला भरधाव डंपर धडकल्यामुळे पादचारी पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच हा पूल पादचाऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेऊन या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी सायन-पनवेल मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मागील ८ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाशीकडून बेलापूरच्या दिशेने जाणारा भरधाव डंपर सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा येथील पादचारी पुलाला धडकला होता. त्यानंतर त्याच्या पाठीमागील भाग या पादचारी पुलाच्या मधोमध अडकला होता. सुदैवाने या अपघातात डंपरचालक किंवा इतर कुणीही जखमी झाले नाही. त्या वेळी तुर्भे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ हा अपघाती डंपर बाजूला काढला होता, मात्र या अपघातामुळे या पादचारी पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुलाची स्टील संरचना व रेलिंग वाकले असून, काही भाग तुटल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.
.............................
पादचारी पूल नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. येत्या गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ११ ते सकाळी सहा या कालावधीत या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या पुलाच्या दुरुस्ती कामादरम्यान सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात यावे, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे केली आहे. तसेच वाशी येथून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहने पाम बीच मार्गाने वळवण्याबाबत सूचित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.